Thergaon News: युवा सेनेतर्फे बालदिनानिमित्त रविवारी थेरगावात बालजत्रा, मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर युवा सेना व विश्वजीत बारणे यांच्या सहकार्यातून बालदिनानिमित्त उद्या (रविवारी) बालजत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये खाऊगल्लीचे विशेष आकर्षण असून मनोरंजनाचे विविध कार्यक्रम सुद्धा घेतले जाणार आहेत, अशी माहिती शहर युवासेना प्रमुख विश्वजीत बारणे यांनी दिली.

थेरगावातील पद्मजी पेपर मिल शेजारी रविवारी दुपारी 4 ते रात्री 10 या वेळेत बालजत्रा भरणार आहे. शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्या हस्ते बालजत्रेचे उद्घाटन होणार आहे. त्याचबरोबर दिवाळिनिमित्त सम्राट मित्र मंडळातर्फे घेण्यात आलेल्या भव्य गडकिल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे.

युवासेना प्रमुख विश्वजीत बारणे म्हणाले की, ”भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांचा जन्म दिवस 14 नोव्हेंबर हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त दिवाळीच्या सुट्टीमध्ये मुलांना आनंद लुटण्यासाठी बालजत्रेचे आयोजन केले आहे. लहान मुलांसाठी खाऊगल्ली, मनोरजंनाचे कार्यक्रम होणार आहेत.” दरम्यान, थेरगाव परिसरातील पालक, बालकांनी जत्रेत सहभागी व्हावे. जत्रेचा आनंद घ्यावा’ असे आवाहन बारणे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.