Dehuroad : कच्छी दाबेलीची गाडी लावण्यावरून तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – कच्छी दाबेलीची गाडी लावण्यावरून दोन तरुणांमध्ये भांडण झाले. या भांडणात एका तरुणाने दुस-या तरुणाला स्टीलच्या पाईपने मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. हा प्रकार सोमवारी (दि. 17) दुपारी साडेतीनच्या सुमारास रावेत येथे घडला.

राजमल नारायण गुर्जर (वय 23, रा. वाल्हेकरवाडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार नागेश्वर (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजमल आणि नागेश्वर हे दोघेही कच्छी दाबेलीचा व्यवसाय करतात. कच्छी दाबेलीची गाडी लावण्यावरून राजू आणि नागेश्वर यांच्यामध्ये सोमवारी दुपारी वाद झाला. ‘माझ्या गाडीच्या शेजारी तुझी गाडी लावायची नाही’, असे नागेश्वर राजूला म्हणाला. त्यावर राजू म्हणाला, ‘मी इथेच गाडी लावणार’. यावरून नागेश्वरने स्टीलच्या पाईपने राजूला मारहाण केली. यामध्ये राजू गंभीर जखमी झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.