Pimpri : अनधिकृत वृक्षतोड प्रकरणी कारवाईची मागणी

एमपीसी न्यूज – विजयनगर, काळेवाडी येथील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये विना परवाना वृक्षतोड करण्यात आली आहे. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य नंदकुमार सातुर्डेकर यांनी केली आहे.

याबाबत महापालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात सातुर्डेकर यांनी म्हटले आहे, महापालिका रोपे लागवडीवर कोट्यवधी रुपये खर्च करते. रोपे जगविण्यासाठी प्रयत्न केले जातात. तर, दुसरीकडे सर्रासपणे अनधिकृतपणे वृक्षतोड केली जाते. अनधिकृतपणे वृक्षतोड करणा-यांवर कठोर कारवाई केली पाहिजे.

दोन दिवसांपूर्वी काळेवाडी येथील एका गृहनिर्माण सोसायटी मध्ये विना परवाना वृक्षतोड करण्यात आली आहे. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.