Pune News : अक्षय्यतृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांना 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य 

एमपीसी न्यूज : अक्षय्य तृतीयेचे निमित्त साधून पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा ला 11000 आंब्याचा महानैवेद्य दाखवण्यात आला. या आंब्यांची सुरेख आकर्षक रचना करून बाप्पाच्या चरणी मांडणी करण्यात आली आहे. पुण्यातील आंब्याचे व्यापारी देसाई बंधू आंबेवाले यांच्या वतीने दरवर्षी  अक्षयतृतीया निमित्त हा आंब्याचा महानैवेद्य दाखवण्यात येतो.

 हे आंबे ऊद्या ससून मधील रुग्ण,अनाथाश्रम,वृद्ध आश्रम ,दिव्यांग  आणि भाविंकांना प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहे .आंब्यांची हि आरास पाहण्यासाठि भाविकांनी आज सकाळ पासूनच गर्दी केली होती हा क्षण आपल्या मोबाईल मधे साठवण्यासाठि अनेकांचे मोबाईल सरसावले होते

आंबा महोत्सव निमित्त मंदिरामध्ये पहाटे 4 ते 6 प्रसिद्ध गायिका आशा ताई खाडिलकर यांचा। स्वराभिषेक हा कार्यक्रम सादर करण्यात आला.त्यानंतर सकाळी 8 ते 12 गणेश याग, दुपारी 12.36 ला भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा शारदेश मंगलम विवाह सोहळा। आणि रात्री 9 वाजता अखिल भारतीय महिला मंडळाच्या वतीने भजन आयोजित करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.