Pune : ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटीमधून सवलतीचा प्रवास फक्त 4 हजार किलोमीटर पर्यंतच

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने आता ज्येष्ठ नागरिकांना प्रवास शुल्कामध्ये सवलत घेण्यासाठी येत्या 1 एप्रिलपासून स्मार्टकार्ड बंधनकारक केले असून आता त्यांच्यासाठी सवलतीच्या प्रवासासाठी किलोमीटरची मर्यादा घालून दिली आहे. वर्षभरामध्ये फक्त 4 हजार किलोमीटरचा प्रवास सवलतीच्या दरामध्ये करता येणार असून त्या पुढील प्रवासासाठी ज्येष्ठांना आता जादाचे पैसे मोजावे लागणार आहेत. एसटीच्या नव्या स्मार्टकार्ड अंमलबजावणीनंतर हा निर्णय राज्यभरात लागू होणार आहे.

प्रवासादरम्यान सवलत घेण्यासाठी स्मार्टकार्डची मुदत तीन महिन्यांनी वाढवून मार्च महिन्यापर्यंत करण्यात आली आहे. सध्या महामंडळातर्फे ज्येष्ठ नागरिकांना निमआराम बसमध्ये 50 टक्के, शिवशाही बसमध्ये 45 टक्के तर शिवशाही स्लीपर बसमध्ये ३० टक्के सवलत दिली जाते. एसटीमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या सुमारे 10 लाख असून 4 हजार किलोमीटरची मर्यादा आल्यामुळे प्रवासी संख्या घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी एसटीच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.