Pune: कोरोनाचे 1705 रुग्ण, 773 जणांना डिस्चार्ज, 11 जणांचा मृत्यू

1705 new corona patients, 773 persons discharged, 11 deaths.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या शुक्रवारी 6 हजार 811 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1705 रुग्ण आढळले. 773 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. 11 जणांचा मृत्यू झाला.

पुणे शहरात कोरोनाचे आता 34 हजार 40 रुग्ण झाले आहेत. दरम्यान, गुरुवारी कोरोनाचे 31 हजार 884 रुग्ण होते. आज (शुक्रवारी) 1705 रुग्ण ऍड केल्यावर एकूण 33 हजार 589 रुग्ण होतात.

आजच्या रिपोर्टमध्ये 34 हजार 40 रूग्णसंख्या केली आहे.

नेमकी एकूण रूग्णसंख्या किती झाली? याबाबत पुणे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत संपर्क केला. पण, या अधिकाऱ्यांनी उत्तर दिले नाही.

527 क्रिटिकल रुग्ण असून त्यात 82 जण व्हेंटिलेटरवर आहेत. 21 हजार 107 नागरिकांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.

या विषाणूमुळे आजपर्यंत 917 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे शहरात 12 हजार 16 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

महात्मा फुले पेठेतील 82 वर्षीय पुरुषाचा, धनकवडीतील 67 वर्षीय पुरुषाचा, 50 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, कोथरूडमधील 70 वर्षीय पुरुषाचा, सिंहगड रोडवरील 72 वर्षीय पुरुषाचा, वडगावशेरीमधील 76 वर्षीय पुरुषाचा, नाना पेठेतील 67 वर्षीय पुरुषाचा, सदाशिव पेठेतील 70 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, शिवाजीनगरमधील 60 वर्षीय पुरुषाचा सिमबायोसिस हॉस्पिटलमध्ये, चंदननगरमधील 77 वर्षीय महिलेचा, इंद्रायणीनगरमधील 68 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.