Talegaon News : गांजा बाळगल्याप्रकरणी 19 वर्षीय तरुणाला अटक 

एमपीसी न्यूज – गांजा बाळगल्याप्रकरणी 19 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. भीमाशंकर कॉलनी, यशवंत नगर, तळेगाव दाभाडे येथे गुरुवारी (दि. 21) अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली. 

विनू सुदाम धुमाळ (वय 19, रा. संभाजी नगर, तळेगाव दाभाडे) असे अटक आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक अजित लिंबराज कुटे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने 14,225 रुपये किंमतीचा 569 ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. विक्री करण्याच्या उद्देशाने त्याने हा गांजा जवळ बाळगला होता. आरोपी अटक असून, तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.