India Corona Update : देशात 2.14 लाख सक्रिय रुग्ण, गेल्या 24 तासांत 15,968 नवे रुग्ण 

एमपीसी न्यूज – देशभरात मागील 24 तासांत 15 हजार 968 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे तर, 202 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्यानं वाढ होणा-या रुग्णांपेक्षा बरे होणा-या रुग्णांची संख्या वाढली असल्याने देशातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सध्या देशात 2 लाख 14 हजार 507 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

गेल्या 24 तासांत झालेल्या वाढीमुळे देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 04 लाख 95 हजार 147 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 01 लाख 29 हजार 111 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. त्यापैकी 17 हजार 817 बरे झालेल्या रुग्णांना गेल्या 24 तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

 

 

गेल्या 24 तासांत देशभरात 202 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 51 हजार 529 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.44 टक्के एवढा आहे तर, रिकव्हरी रेट 96.48 टक्के एवढा आहे.

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 18 कोटी 34 लाख 89 हजार 114 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 8 लाख 36 हजार 227 नमून्यांची तपासणी मंगळवारी (दि.12) करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून दररोज होणा-या चाचण्यांचे प्रमाण दहा लाखांच्या खाली आले आहे.

 

कोरोना लसीकरणाला 16 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. सीरमची कोव्हिशील्ड या लसीचे डोस देशात वेगवेगळ्या ठिकाणी वितरीत केले जात आहेत. दिल्ली, गोवा, बिहार, गुजरात आणि मुंबईत या लसीच्या पहिल्या ऑर्डर पोहोचल्या आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.