kasarwadi News : कोयता बाळगल्याप्रकरणी 21 वर्षीय युवकाला अटक

एमपीसी न्यूज – कोयता बाळगल्याप्रकरणी 21 वर्षीय युवकाला भोसरी पोलिसांनी  अटक केली आहे. पिंपळे गुरव कडे जाणा-या रस्त्याच्या कडेला कासारवाडी येथे शुक्रवारी (दि.04) ही कारवाई करण्यात आली.

अर्शद हनीफ सय्यद (वय 21, रा. कासारवाडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याबाबत स्वामी विठ्ठल नरवडे (वय 33) यांनी शनिवारी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत घातक शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. आरोपी अर्शद सय्यद याने त्याच्या जवळ लोखंडी कोयता बाळगल्याचे आढळून आले. भोसरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.