Hinjawadi Crime News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग, 22 वर्षीय आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी 22 वर्षीय आरोपीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. साखरेवस्ती, मुळशी येथे गुरूवारी (दि.24) सकाळी 9.00 वा ही घटना घडली.

सचिन छगन जाधव (वय 22, रा. साखरेवस्ती, मुळशी) असे अटक आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीच्या वडीलांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अटक आरोपी विरोधात भारतीय दंड विधान कलम 509, 504, 506, पोक्सो कलम 12 अंतर्गत असा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपीने फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीला शिवीगाळ करून तिच्याशी अश्लिल कृत्य केले व धमकी दिली. असे फिर्यादीत नमूद केले आहे. आरोपीला अटक केली असून, हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.