Pune News : “एका थाळी वर दोन थाळी फ्री” ची जाहिरात पडली महागात
बँक खात्यातून 31 हजार पळवले
एमपीसी न्यूज : एक थाळी घेतल्यास दोन थाळी फ्री मिळतील अशी जाहिरात करून त्याद्वारे एका व्यक्तीची 31 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. सहकार नगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी मोहम्मद इराफत सैद आलम नियाझी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी दीपक विश्वनाथ जगदाळे (वय 51) त्यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी धनकवडी येथील घरी असताना मोबाईल वर फेसबुक चेक करत होते. त्यावेळी त्यांना एका मोबाईल क्रमांकावरून फोन आला. समोरील व्यक्तीने पुण्यातील एका प्रसिद्ध हॉटेलची 250 रुपयांची एक थाळी घेतल्यास दोन थाळी फ्री मिळतील” अशी ऑफर सुरू असल्याचे सांगितले.
फिर्यादी यांना देखील ते खरे वाटले. त्यानंतर आरोपी तरुणाने फिर्यादी यांच्या मोबाईल वर एक लिंक पाठवली. फिर्यादीने ही लिंक उघडताच त्यांच्या जनसेवा बँकेच्या खात्यातून 31,137 रुपये काढून घेऊन त्यांची फसवणूक केली आहे.