India Corona Update : गेल्या 24 तासांत देशभरात 43,071 नवे रुग्ण, 52,299 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – देशात गेल्या 24 तासांत देशभरात 43 हजार 071 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 52 हजार 299 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात सध्याच्या घडीला 4 लाख 85 हजार 350 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 05 लाख 45 हजार 433 एवढी झाली आहे. त्यापैकी 2 कोटी 96 लाख 58 हजार 078 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

भारतात कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या चार लाखांच्या पुढे गेली आहे. आजवर 4 लाख 02 हजार 005 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 955 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.31 टक्के एवढा आहे. तसेच, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याने रिकव्हरी रेट वाढून 97 टक्क्यांवर पोहोचला आहे.

देशात आजवर 41 कोटी 82 लाख 54 हजार 953 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 18 लाख 38 हजार 490 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 35 कोटी 12 लाख 21 हजार 306 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.