Dehuroad News : शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांवर कारवाई

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांवर भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (दि. 3) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास गुंडा विरोधी पथकाने विकासनगर रोडवर ही कारवाई केली.

गुंडा विरोधी पथकातील पोलीस शिपाई शुभम कदम यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एम बी कॅम्प देहूरोड येथील विकासनगर रोडवर दोन अल्पवयीन मुले शस्त्र घेऊन थांबली आहेत. अशी माहिती पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी दुपारी साडेचार वाजता परिसरात सापळा लावून कारवाई केली. त्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील एकाकडून लोखंडी कोयता आणि दुसऱ्या मुलाकडून मोठा रॅम्बो चाकू चामडी कव्हरसह जप्त करण्यात आला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.