Budget 2023 : अर्थसंकल्पात मोठी घोषणा; पुण्यातल्या भिडेवाडा स्मारकासाठी 50 कोटींचा निधी!

एमपीसी न्यूज : पुण्यातील सावित्रीबाई फुले यांनी उभारलेल्या पहिली मुलींची शाळा असलेल्या भिडे वाड्याचा प्रश्न मागील काही दिवसांपासून प्रलंबित आहे. (Budget 2023)  त्यासाठी आता अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 50 कोटींचा निधी जाहीर केला आहे. आज अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023-24 या वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. त्यात भिडे वाड्यासाठी निधी जाहीर केला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्य सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पादरम्यान,अनेक मोठ्या आणि महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुण्यातील बुधवार पेठ येथील भिडे वाड्यासाठीही तरतूद करण्यात आली आहे.

अर्थसंकल्प सादर करताना फडणवीस म्हणाले, “भारतातील पहिली मुलींची शाळा पुणे शहरातील भिडे वाडा येथे सुरू झाली. ज्ञानज्योती सावित्रिबाई फुले राष्ट्रीय स्मारक (Budget 2023) निर्माण करण्यासाठी 50 कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली,” फडणवीस यांनी जाहीर केली.

Pimpri News : शिवणेतील बंधा-यातून पाणी उचला – श्रीरंग बारणे

भिडे वाडा हा अत्यंत मोडकळीस आलेल्या अवस्थेत होता. याकडे शासनाचं नेहमीच दुर्लक्ष होतं आले आहे. आता शिंदे फडणवीस सरकार यांनी भिडे वाड्याचं जतन करून,(Budget 2023) त्यांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं यासाठी सरकारने तरतूद केली आहे. यापुढे आता भिडे वाड्याची दुर्दशा थांबून, त्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर किती वेळात होणार, हे पाहणे महत्वपूर्ण आहे.

सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक पुणे येथील भिडे वाडा याठिकाणी करण्यासंदर्भात तात्काळ बैठक घेऊ आणि या राष्ट्रीय स्मारकासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिसेंबर महिन्याच्या दरम्यान दिले होते. विधानसभेत सांगितले. त्या नुसार आता अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.