Bhosari News : ज्वेलर्समधील महिलेला बोलण्यात गुंतविले अन् सोन्याच्या वाट्या लांबविल्या

एमपीसी न्यूज – भोसरीतील भांबुर्डेकर ज्वेलर्समधील (Bhosari News) विक्रेत्या महिलेला बोलण्यात गुंतवून तीन महिलांनी तिची नजर चुकवून पावणेदोन लाख रूपये किमतीच्या सोन्याच्या वाट्या लांबवल्याचा प्रकार 4 मार्च रोजी घडला.

याबाबत शितल सिताराम दळवी-कांगणे (वय 34, रा. धावडे आळी, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Maharashtra budget 2023 : शहरातील सत्ताधा-यांकडून कौतुक तर विरोधकांकडून टीकास्त्र

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दळवी या भांबुर्डेकर सराफ अ‍ॅण्ड ज्वेलर्स या दुकानात सेल्समन म्हणून नोकरीला आहेत. 4 मार्च रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्या दुकानात (Bhosari News) असताना तीन महिला दागिने खरेदीच्या बहाण्याने दळवी यांच्या काऊंटरवर आल्या. दागिने पाहत असताना महिलांनी दळवी यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. त्यांची नजर चुकवून 1 लाख 75 हजार रूपये किमतीच्या सोन्याच्या वाट्या चोरून त्या पसार झाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87a893ee9dc66072',t:'MTcxNDE1NTUzNS4wMzcwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();