India Corona Update : गेल्या 24 तासांत 50,129 नवे रुग्ण, रिकव्हरी रेट 90 टक्क्यांवर

एमपीसी न्यूज – गेल्या चोवीस तासांत 50 हजार 129 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येने 78 लाखांचा टप्पा पार केला आहे. तर, आजवर तब्बल 70 लाख करोनाबाधित रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत. त्यामुळे देशाचा रिकव्हरी रेट हा 90 टक्क्यांवर पोहोचला आहे.

देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 78 लाख 64 हजार 811 वर पोहोचली असून यांपैकी 6 लाख 68 हजार 154 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर 70 लाख 78 हजार 123 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या चोवीस तासांत 62 हजार 027 रुग्ण बरे झाले आहेत. आजवर कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांची संख्या 1 लाख 18 हजार 534  इतकी असून 578 नव्या रुग्णांचा चोवीस तासांत मृत्यू झाला आहे.

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येतली घट सलग गेल्या काही दिवसांपासून कायम आहे. तर कोरोना मुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असून राज्यांचं कोरोनामुक्तीचं प्रमाण हे 89 टक्क्यांच्या जवळ गेलं आहे. शनिवारी राज्यात 10,004 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर 6,417 रुग्णांची नव्याने भर पडली. राज्यात 137 जणांचा मृत्यू झाला. राज्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 16,38,961 एवढी झाली आहे. तर 14,55,107 जण कोरोनामुक्त झाले. तर आत्तापर्यंत 43,152 जणांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या 1,40,194 एवढ्या रुग्णांवर उपचार सुरू आहे.

भारतात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढल आहे. देशात 70 लाख रुग्ण बरे होण्याचा हा विक्रम असून त्यामुळे देशाचा रिकव्हरी रेट हा 90 टक्क्यांवर पोहोचला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.