Pawananagar : काले ग्रामपंचायतीस निधी देण्याचे बाळा भेगडे यांचे आश्वासन

एमपीसी न्यूज – संजय उर्फ बाळा भेगडे यांनी राज्यमंत्रीपद मिळताच काले-पवनानगर ग्रामपंचायतीस निधी देण्याचे आश्वासन दिले आहे.
मावळ तालुक्यातील काले-पवनानगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपाचे खंडू ज्ञानेश्वर कालेकर यांची निवड झाल्याबद्दल बाळा भेगडे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच व सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी संजय उर्फ बाळा भेगडे यांनी काले-पवनानगर ग्रामपंचायतीस विकास कामांसाठी जास्तीत जास्त निधी देण्याचे आश्वासन दिले.यावेळी नवनियुक्त सरपंच, सदस्य व या भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.