Pune : विना परवाना औषध विक्री प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
एमपीसी न्यूज – विना परवाना औषध विक्री केल्याप्रकरणी तीन जणांवर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन अधिकारी सुहास सावंत यांनी या प्रकरणी फिर्याद दिली.
योगेश आशिष व सुरेश (पूर्ण नाव माहित नाही), अशी या तिघांची नावे आहेत.
दुकान मालक योगेश याने आशिष व सुरेश यांच्याकडून बिलाशिवाय खरेदी केली. तसेच परवाना नसताना देखील या औषधांची विक्री केली. याप्रकणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वारगेट पोलीस अधिक तपास करीत आहेत.