Pimpri : भाजप नगरसेवकांची तातडीची बैठक; शहराध्यक्षांनी बोलविली बैठक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकांची तातडीची बैठक बोलविण्यात आली आहे. शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी आज (बुधवारी)दुपारी दोन वाजता बैठक बोलविली आहे.  ही बैठक मोरवाडी येथील भाजपच्या पक्ष कार्यालयात होणार असून सर्व नगरसेवकांना बैठकीचे संदेश धाडले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये राजीनामा नाट्य काही केल्या संपत नाही. सत्तेला दोन वर्ष पूर्ण झाली तरी नगरसेवकांचे राजीनामा सत्र सुरुच आहे. विषय समित्यांचे सदस्य नाराजीतून राजीनामे देत आहेत. नगरसेवक महासभेत विरोधात बोलत आहे. शहरात कच-याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर झाली आहे. स्वपक्षीय नगरसेवक सातत्याने विरोधात भूमिका घेत आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजपमध्ये नेमके चाललं काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

त्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी आज (बुधवारी) दुपारी दोन वाजता नगरसेवकांची तातडीची बैठक बोलविली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.