Chakan : ट्रेलर-टेम्पोचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या ट्रेलरने टेम्पोला धडक दिली. या भीषण अपघातात टेम्पोचालकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 1) पहाटे दोनच्या सुमारास महाळुंगे येथे मिंडा कंपनीच्या गेटसमोर घडली.

शेख जनोद्दीन शेख अफजल (वय 46, रा. कलमुला, ता. पूर्णा, जि. परभणी) असे मृत्यू झालेली टेम्पो चालकाचे नाव आहे. याप्रकरणी मंगल घणीशाम मुंजी (वय 32, रा. मॅगझीन चौक, दिघी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगल याने सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेता ट्रेलर (एमएच 14 /एचजी 1991) चालवला. त्याच्याकडे कोणताही परवाना नसताना त्याने ट्रेलरमध्ये जॉब भरून नेत होता. मंगल महाळुंगे येथील मिंडा कंपनीच्या समोर आला असता समोरच्या बाजूने आलेल्या टेम्पोला (एमएच 14 / एफटी 0891) जोरात धडक दिली.

यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये टेम्पोचालक शेख गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत पोलीस हवालदार अरुण लगड यांनी फिर्याद दिली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.