Bhosari : ‘पिस्तूल’ विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक; दोन पिस्तुल, चार काडतूससह दुचाकी जप्त

गुन्हे शाखेची कामगिरी

एमपीसी न्यूज – पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या दोघांना खंडणी/दरोड विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तुल, चार जिवंत काडतूस आणि दुचाकी असा एक लाख 17 हजारांचा ऐवज हस्तगत केला. ही घटना भोसरी येथे घडली.

अरविंद शिवाजी डोळे (वय 24) आणि विपुल शिवाजी यादव (वय 23, दोघेही रा. कॅन्सर हॉस्पीटल शेजारी, ता. बार्शी, जि. सोलापुर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी सुधीर डोळस व गणेश कोकणे यांना आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार भोसरीतील हॉटेल रोशन गार्डन समोर आलेल्या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता दोघांच्याही कमरेला प्रत्येकी एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतूसे आढळली. पोलिसांनी त्यांच्या दुचाकीसह एक लाख 17 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला.

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, सहाय्यक आयुक्त राजाराम पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सुधीर अस्पत, उपनिरीक्षक विठ्ठल बढे, कर्मचारी महेश खांडे, नितीन लोखंडे, आशिष बनकर, गणेश कोकणे व सुधीर डोळस यांचे पथकाने ही कामगिरी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.