Nigadi : विक्रीसाठी आणलेला सव्वा लाख रुपयांचा गांजा जप्त; एकास अटक

अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – विक्रीसाठी आणलेला सुमारे पाच किलो वजनाचा सव्वा लाख रुपयांचा गांजा पोलिसांनी हस्तगत केला. अमली पदार्थ विरोधी पथकाने निगडी परिसरात ही कारवाई केली.

अजय अरूण जौंजट (वय 25, रा. पाटीलनगर, शिवाजीनगर, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस हवालदार राजेंद्र देवराम बांबळे (वय 41) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 17) सकाळी पावणे अकरा वाजताच्या सुमारास आरोपी अजय जौंजट हा गांजा विक्रीसाठी निगडीतील कै. अंकुशराव बोऱ्हाडे चौकात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा लावून त्यास अटक केली. त्याच्याकडे पाच किलो 150 ग्रॅम वजनाचा एक लाख 28 हजार 750 रुपयांचा गांजा मिळून आला. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वसंत मुळे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.