Dapodi : दापोडीतील घटनेतील दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – दापोडीत झालेली घटना अतिशय दुर्देवी आहे. या घटनेला जबाबर असणा-यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजपचे सचिव विशाल वाळुंजकर यांनी केली आहे. तसेच ठेकेदारावर देखील कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

दापोडीत महापालिकेच्या अमृत योजनेचे काम सुरु आहे. त्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात अंगावर माती पडलेल्या मजुरांना वाचविताना एक अग्निशामक जवान शहीद झाला आहे. तर, एका मजुराचा देखील मृत्यू झाला आहे. याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

अग्निशामक जवान, मजुराचा मृत्यूला जबाबदार कोण?, याप्रकाराची सखोल चौकशी करावी. महापालिकेचे अधिकारी, ठेकेदार यांनी सुट्टीच्या दिवशी काम चालू का ठेवले?, एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम चालू होते. त्याठिकाणी सुरक्षारक्षक व कामाविषयी बोर्ड लावण्यात का आले नव्हते? स्थानिक लोकप्रतिनिंधीना याबाबत माहिती होती का? असे विविध प्रश्न उपस्थित करत या घटनेला जबाबदार असणा-यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपचे सचिव विशाल वाळुंजकर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.