Wakad : वाईन शॉपमधून दारुच्या बाटल्या चोरीला
एमपीसी न्यूज – नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वाईनशॉपमधून वेगवेगळ्या कंपनीच्या दारुच्या 31 बाटल्या चोरट्याने चोरून नेल्या. हा प्रकार बुधवारी (दि. 1) रात्री पावणेअकरा ते गुरुवारी (दि. 2) सकाळी दहाच्या दरम्यान विशालनगर, काळेवाडी येथे घडला.
सिध्देश हरीश लालवाणी (वय 30, रा. पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लालवाणी यांचे विशालनगर, काळेवाडी येथे वाईन शॉप आहे. बुधवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास लालवानी यांनी वाईन शॉप बंद केले. त्यानंतर, अज्ञात चोरट्याने शटर उचकटून शॉपमध्ये प्रवेश केला. वेगवेगळ्या कंपनीच्या 71 हजार 210 रुपयांच्या दारुच्या 31 बाटल्या तसेच रोख रक्कम, एक डीव्हीआर व हार्ड डिस्क चोरून नेली. गुरुवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.