Mumbai: शहरात आणखी चार केरोना पॉझिटीव्ह, राज्यातील आकडा 116 वर!

एमपीसी न्यूज – मुंबईत आज सकाळी नवीन चार रुग्णांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 116 वर जाऊन पोहचला आहे. या चार रुग्णांव्यतिरिक्त सांगली जिल्ह्यात पाच नवीन पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्याने आज कोरोनाबाधितांच्या संख्येत नऊने भर पडली आहे.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील 4 कोरोनाच्या संशयीत रूग्णांच्या स्वॅबचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. याच कुटुंबातील आणखी 5 लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सांगली जिल्ह्यात आता कोरोना  रुग्णांची संख्या 4 वरून 9 झाली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 112 पर्यंत वाढली आहे.

अहवालानंतर संबंधित रुग्ण कोणाच्या संपर्कात होते याची तपासणी करण्यात येत आहे. तसेच पुढे घ्यावयाची खबरदारी प्रशासन पूर्णत: घेत आहे. कोणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय साळुंखे यांनी केले आहे.

मुंबई शहर आणि उपनगर – 45
पिंपरी चिंचवड मनपा – 12
पुणे मनपा – 19
नवी मुंबई – 5
कल्याण – 5
नागपूर – 4
यवतमाळ – 4
सांगली – 9
अहमदनगर – 3
ठाणे – 3
सातारा – 2
पनवेल- 1
उल्हासनगर – 1
औरंगाबाद – 1
रत्नागिरी – 1
वसई-विरार – 1
# 25 मार्च दुपारपर्यंतची आकडेवारी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.