Pune : महापालिकेने दिला 859 जणांना निवारा

एमपीसी न्यूज – निराश्रित लोकांसाठी महापालिकेने शहरात 11 निवारा केंद्र उभी केली असून त्यात 859 लोकांची रहाण्याची व्यवस्था केली आहे.

कोरोना संसर्गजन्य आजाराची साथ नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यामध्ये निराश्रित लोकांची रस्त्यावरील गर्दी कमी व्हावी, यासाठी शाळा, नाईट शेल्टर्स अशा ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्यात यावी, असे सूचविले आहे, त्यानुसार व्यवस्था करण्यात आली आहे.

केंद्र सरकारकडून पुढील सूचना मिळेपर्यंत ही व्यवस्था चालू रहाणार आहे. निवारा केंद्रांच्या आसपासच्या काही सामाजिक संस्था, मंडळे, व्यक्ती सध्या या लोकांच्या चहा, जेवणाची सोय करत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.