Pune : ससून रुग्णालयात तेरा महिन्यांच्या चिमुकलीचा कोरोनामुळे मृत्यू; आणखी दोघांचा बळी

एमपीसी न्यूज – पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या तीन कोरोनाबबाधित रुग्णांचा रविवारी मृत्यू झाला. वारजेतील 13 महिन्यांच्या चिमुकलीचा यामध्ये मृत्यू झाला असून आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे.

या चिमुरडीला 4 मे रोजी कोरोनाची बाधा झाल्यामुळे ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिला इतरही आजार होते. उपचार सुरू असताना आज सकाळी 7:30 वाजता तिची प्राणज्योत मालवली. याशिवाय आज आणखी दिवसभरात ससून रुग्णालयात 82 आणि 37 वर्षीय रुग्णाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आतापर्यंत ससून रुग्णालयात 394 पॉझिटिव्ह रुग्ण दाखल झालेत. त्यातील 76 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, 89 रुग्णांचा आतापर्यंत एकट्या ससून रुग्णालयात मृत्यू झाला आहे. पुणे महापालिका कार्यक्षेत्रात आजवर कोरोनाबाधित 2380 रुग्ण आहेत. त्यातील एकूण 143 जनांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांना इतरही आजार असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये किडनी विकार, मधुमेह असे प्रामुख्याने आजारांचा समावेश आहे. मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागांत कोरोनाचे रुग्ण वाढतेच आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी कोरोना प्रतिबंदीत क्षेत्रामध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद करण्याचा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.