Chikhali : जमिनीच्या वादातून पती-पत्नीवर कोयत्याने वार
एमपीसी न्यूज – गावाकडील जमिनीच्या वादातून पती पत्नीवर कोयत्याने वार करण्यात आले. ही घटना मंगळवारी (दि.19) रात्री मोरेवस्ती, चिखली येथे घडली.
तुषार कल्याण शिंदे (वय 30 रा. विवेकानंद सोसायटी, मोरेवस्ती, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत उद्धव हरिभाऊ शिंदे (वय 45, रा. अष्टविनायक चौक, मोरेवस्ती, चिखली) यांनी बुधवारी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उद्धव शिंदे यांची बीड जिल्ह्यातील साधोळा या मूळगावी पाच एकर वडिलोपार्जित शेतजमीन आहे. या जमिनीच्या वादातून मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास आरोपी तुषार शिंदे हा कोयता घेऊन फिर्यादी यांच्या घरी आला. त्याने फिर्यादी यांना ‘तू बाहेर ये’ असे म्हणत फिर्यादी यांच्या पत्नीला ढकलून दिले.
त्यानंतर आरोपी शिंदे याने फिर्यादी शिंदे यांच्या डोक्यात आणि हाताच्या बोटांवर कोयता मारून जखमी केले. फिर्यादी उद्धव यांची पत्नी त्यांना वाचविण्यासाठी आली असता आरोपी शिंदे याने त्यांच्याही डोक्यात, मनगटावर कोयत्याने मारून जखमी केले.
चिखली पोलीस करीत आहेत.