Pune: दगडूशेठ गणपती मंदिर 30 जूनपर्यंत बंदच राहणार
Pune: Dagdusheth Ganpati temple will remain closed till June 30
एमपीसी न्यूज- पुण्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. दररोज रुग्णसंख्येत मोठ्याप्रमाणात भर पडत आहे. त्यामुळे शासनाने सार्वजनिक ठिकाणे व मंदिरे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर शासन आदेशाप्रमाणे दि. 30 जूनपर्यंत बंद राहणार आहे.
केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमावलीनुसार काही राज्यांतील मंदिरे दिनांक 8 जून पासून खुली होत असली, तरीही राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्यातील मंदिरे 30 जून पर्यंत बंदच राहणार आहेत.
दि. 8 जून रोजी संकष्टी चतुर्थी असली तरी दगडूशेठ मंदिर बंदच असून गर्दी करू नये, असे आवाहन दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.