Monsoon Update: मुंबई-पुण्यासह उर्वरित महाराष्ट्रात मान्सून दाखल
Monsoon Update: Monsoon arrives in Mumbai-Pune and rest of Maharashtra दक्षिण आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर गुरुवारी दक्षिण-पश्चिम मान्सूनचे आगमन झाल्याची घोषणा करण्यात आली होती.
एमपीसी न्यूज- मुंबई-पुण्यासह उर्वरित महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. शनिवारी मुंबईसह राज्यातील अनेक भागात पाऊस झाला होता. हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी 24 तासांत महाराष्ट्रातील इतर भागातही मान्सून पोहोचणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. हा अंदाज खरा ठरला असून उर्वरित महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे.
Advancement of Southwest Monsoon on 14.06.2020 pic.twitter.com/joZ6abdAAz
— India Met. Dept. (@Indiametdept) June 14, 2020
शनिवारी कोकणातील हर्णे, मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, मराठवाड्यातील औरंगाबाद आणि विदर्भातील गोदिंया येथे पाऊस झाला होता. आज (दि.14) महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसासाठी अनुकूल वातावरण आहे.
दक्षिण आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर गुरुवारी दक्षिण-पश्चिम मान्सूनचे आगमन झाल्याची घोषणा करण्यात आली होती.