Dhule: सेल्फी काढताना तोल गेला, तीन युवक धबधब्यात बुडाले

Dhule: lost balance while taking a selfie, three youths drowned in a waterfall हे तरुण थेट डोहापर्यंत पोहचले. या ठिकाणी उतार असलेल्या खडकाळ भागाजवळ हे सर्वजण थांबले होते.

एमपीसी न्यूज- धुळे शहरापासून जवळ असलेल्या लळिंगच्या डोहातून वाहणाऱ्या धबधब्यात तीन युवक बुडाले. ही घटना सोमवारी घडली. दोघांचे मृतदेह सापडले असून तिसऱ्याचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरु होता. सेल्फी काढताना तोल गेल्याने हे युवक धबधब्यात घसरुन पडल्याचे सांगण्यात येते.

मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या लळिंग येथील धबधब्याला पावसामुळे भरपूर पाणी आले आहे. सोमवारी दुपारी धुळे शहरातील सहा तरुण फिरण्यासाठी गेले होते. त्यात रोहित गिरासे, शुभम पाटील व शुभम चव्हाण यांचा समावेश होता.

हे तरुण थेट डोहापर्यंत पोहचले. या ठिकाणी उतार असलेल्या खडकाळ भागाजवळ हे सर्वजण थांबले होते. या वेळी सेल्फी काढताना तोल गेल्याने रोहित डोहात पडला. त्याला वाचवण्यासाठी शुभम पाटील पुढे आला. त्यांच्या मदतीसाठी जाताना शुभम चव्हाण दोघांवर पडला. त्यानंतर तिघेही डोहात वाहत गेले.

राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने सायंकाळी उशिरापर्यंत तिघांचा शोध घेतला. त्यात शुभम पाटील व रोहित गिरासे यांचे मृतदेह सापडले असून तिसरा तरुणाच शोध सुरु होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.