Talegaon Dabhade: राष्ट्रवादीच्या वतीने नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, फेसशिल्डचे वाटप

Talegaon Dabhade: NCP distributes sanitizer, face shield to Municipal Council employees कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नगरपरिषद कर्मचारी रात्रंदिवस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कार्यरत आहेत.

एमपीसी न्यूज- नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गणेश काकडे यांच्या वाढदिवसानिमित राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तळेगाव दाभाडे अध्यक्ष आशिष खांडगे यांनी नगरपरिषद कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर आणि फेसशिल्डचे वाटप केले. यावेळी रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नगरपरिषद कर्मचारी रात्रंदिवस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांची सुरक्षितता ही तेवढीच महत्त्वाची आहे. म्हणून नगरपरिषद सभागृहात आयोजित कार्यक्रमात ५० लिटर सॅनिटायझर आणि १०० फेसशिल्डचे नगरपरिषद कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आले.

याप्रसंगी गणेश काकडे, मुख्याधिकारी दीपक झिंजाड, उपनगराध्यक्ष वैशाली दाभाडे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला तळेगाव दाभाडे अध्यक्षा सुनिता काळोखे, वडगाव महिला अध्यक्षा ज्योती जाधव, ज्योती शिंदे, कल्पेश भगत, नीलेश लोंढे, रामदास मांडेकर आणि नगरपरिषद कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

या प्रसंगी आशिष खांडगे, कल्पेश भगत, मुख्याधिकारी दीपक झिंजाड आणि उपनगराध्यक्ष वैशाली दाभाडे यांनी मनोगत व्यक्त करून गणेश काकडे यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल धर्माधिकारी यांनी केले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.