Pimpri : संजय वडके यांचे निधन

संजय वडके एक शिस्तप्रिय अधिकारी म्हणून टेल्को आणि टाटा मोटर्स वर्तुळात ओळखले जायचे. : Sanjay Wadke passes away

एमपीसीन्यूज : निगडी – प्राधिकरण येथील टाटा मोटर्सचे निवृत्त अधिकारी संजय रत्नाकर वडके ( वय-59 ) यांचे आज, बुधवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुलगे असा परिवार आहे. पत्रकार राजन वडके यांचे ते ज्येष्ठ बंधू होते.

संजय वडके हे मूळचे शिवाजीनगर येथील वाकडेवाडीचे. तत्कालीन टेल्को कंपनीच्या एफटीए -14  बॅचचे ते विद्यार्थी होते. ते चांगले चित्रकार होते. उमेदवारीच्या काळात टेल्को हॉस्टेलमधील गणेशोत्सवात त्यांनी केलेली थर्माकोलची उत्कृष्ट सजावट त्याकाळी पिंपरी- चिंचवड शहरात विशेष गाजली होती.

कंपनीच्या पोस्टर स्पर्धेत त्यांनी अनेकदा बक्षिसे पटकावली होती. तसेच त्यांनी काढलेले चित्र कंपनीच्या कला सागर या अंकाच्या मुखपृष्ठावर झळकले होते.

या सजावटीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक झाले होते. त्यांच्या सेवा काळात एक शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जात. त्यांनी टाटा मोटर्स कंपनीतून नुकतिच स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.

वडके हे लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.