India Corona Update: गेल्या 24 तासांत 69,921 नवे रुग्ण, 819 मृत्यू
देशाचा रिकव्हरी रेट 76.6 टक्के एवढा आहे तर मृत्युदर 1.8 टक्के आहे.
एमपीसी न्यूज – देशात मागील 24 तासांत 69 हजार 921 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 819 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 36 लाख 91 हजार 167 एवढी झाली आहे तर, आजवर 65 हजार 288 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
देशात सध्या 7 लाख 85 हजार 996 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे एकूण रुग्णापैकी 28 लाख 39883 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.
Single-day spike of 69,921 new positive cases & 819 deaths reported in India, in the last 24 hours.#COVID19 case tally in the country stands at 36,91,167 including 7,85,996 active cases, 28,39,883 cured/discharged/migrated & 65,288 deaths: Health Ministry pic.twitter.com/uQYh0ViARW
— ANI (@ANI) September 1, 2020
आयसीएमआरने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात सोमवारी (दि.31) 10 लाख 16 हजार 920 नमुने तपासण्यात आले. देशभरात आजवर तब्बल 4 कोटी 33 लाख 24 हजार 834 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.
COVID-19 Testing Update . For more details visit: https://t.co/dI1pqvXAsZ @MoHFW_INDIA @DeptHealthRes #ICMRFIGHTSCOVID19 #IndiaFightsCOVID19 #CoronaUpdatesInIndia #COVID19 pic.twitter.com/MS3HQfODz1
— ICMR (@ICMRDELHI) September 1, 2020
कोरोना बाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले असून देशात गेल्या 24 तासांत 65 हजार 081 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 76.6 टक्के एवढा आहे तर मृत्युदर 1.8 टक्के आहे. देशात सध्या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यांत सर्वाधिक रुग्ण आहेत.
कोरोना जागतिक महामारी सुरू होऊन आठ महिने उलटले आहेत. मात्र, कुठलाच देश या विषाणूचा संसर्ग संपल्याचा दावा करू शकत नाही. आम्हाला माहिती आहे की लोक आता खूप कंटाळले आहेत. पण, हा विषाणू अजूनही गंभीर असून स्वतःची काळजी घेणे फार गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे, जास्त लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करणे कटाक्षाने टाळायला हवे. कारण जिथे जिथे असे झालं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची वाढ झाल्याचे दिसून आले असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे टेड्रोस घेब्रुयासिस यांनी सांगितले आहे.