Talegaon Crime : विवाहितेच्या छळ प्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पत्नीने विकत घेतलेले घर स्वतःच्या नावावर करून देण्याची मागणी पतीने केली. पत्नीला मारहाण करून घर माझ्या नावावर कर किंवा पैसे दे असा दम देत तिचा शरीरिक व मानसिक छळ केला असल्याची फिर्याद तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. हा प्रकार 10 वर्षांपासून 1 ऑक्टोबर 2020 पर्यंतच्या कालावधीत घडला.

देवराम बद्रू पतलावत (वय 40, रा. भोईआळी, तळेगाव दाभाडे) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी पीडीत पत्नीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 वर्षांपूर्वी फिर्यादी महिला आणि आरोपी पती यांचा विवाह झाला. फिर्यादी तळेगाव दाभाडे परिसरात धुणी भांड्याचे काम करतात. तर आरोपी गवंडी काम करतो. त्याला दारूचे व्यसन आहे.

मागील दहा वर्षांपूर्वी विवाहितेने घर विकत घेतले आहे. ते घर आरोपी पती देवराम याने त्याच्या नावावर करून देण्याची मागणी केली. घर नावावर करून दे नाहीतर घराचे पैसे दे, अशी मागणी विवाहितेकडे केली. यावरून देवराम याने पीडीत विवाहितेला वारंवार मारहाण केली.

घर नावावर करून देण्याची मागणी करत देवराम याने विवाहितेला लाकडी बांबूने मारहाण करून जखमी केले. तसेच शिवीगाळ व दमदाटी करून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे आणि पोलीस उपनिरीक्षक इम्रान मुल्ला यांनी तातडीने दाखल घेत गुन्हा नोंदवला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.