Boxing Day Test : बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर
एमपीसी न्यूज – बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. यावेळी संघात मोठे बदल करत पृथ्वी शॉ आणि वृद्धीमान साहाला आराम देण्यात आला आहे तर, शुबमन गिल आणि मोहम्मद सिराज यांना स्थान देण्यात आलं आहे.
दुस-या सामन्यासाठी अष्टपैलू रविंद्र जाडेजाला संघात सामाविष्ट करण्यात आले आहे. फिरकीपट्टू अश्विन तर, वेगवान गोलंदाज बुमराह आणि उमेश यादव यांच्यासोबत युवा मोहम्मद सिराज यांच्यावर गोलंगाजीची धुरा असेल. वृद्धीमान साहाच्या जागी ऋषभ पंतला अंतिम 11 मध्ये संधी देण्यात आली आहे. शुबमन गिल आणि मयांक अगरवाल सलामीला उतरतील.
पहिल्या सामन्यात मानहानीकारक पराभवानंतर दुसऱ्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थित अजिंक्य रहाणे संघाचे प्रधिनिधित्व करणार आहे. टिम इंडियाच्या युवा ब्रिगेडकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
JUST IN: India announce their playing XI for the Boxing Day Test 👀
🧢 Shubman Gill, Mohammad Siraj to debut
🏏 Ravindra Jadeja 🔙 as the all-rounder
🧤 Rishabh Pant to take the gloves pic.twitter.com/RwjDS4j1X5— ICC (@ICC) December 25, 2020
असा आहे संघ –
शुबमन गिल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कर्णधार) , हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविंद्र जाडेजा, आर. अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज