chikhali News : कुदळवाडी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा- युवा सेनेची मागणी

एमपीसीन्यूज : चिखली कुदळवाडी परिसरात दिवसेंदिवस बेकायदेशीररित्या पाच ते दहा पत्र्याचे शेड बांधले जात आहे. याकडे महापालिका अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष होत आहे. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या क्शहराचे अधिकृत पत्रा शेड उभारुन विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

या संदर्भात युवा सेना पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. यावेळी युवा सेनेचे पिंपरी विभाग संघटक निलेश हाके, नगरसेवक राजाभाऊ बनसोडे, युवती सेनेच्या प्रतीक्षा घुले, मोमीन शेख आदी उपस्थित होते.

चिखली कुदळवाडी येथील अनधिकृत बांधकामाला सरकारी यंत्रणा सर्व सोईसुविधा पुरवत आहे. शहरात इतरत्र अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जाते. मात्र, चिखली कुदळवाडी परिसरात केल्या जाणाऱ्या अनधिकृत बांधकामाकडे अतिक्रमण विभाग दुर्लक्ष करीत आहे.

पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना अनधिकृत बांधकामाच्या माध्यमातून शहराचे विद्रुपीकरण केले जात आहे. त्यामुळे चिखली कुदळवाडी परिसरातील अनधिकृत भंगाराच्या दुकानांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.