Pimpri News : महापालिकेतील मुख्य सुरक्षा अधिका-याला उपायुक्ताचा दर्जा
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सुरक्षा विभागातील मुख्य सुरक्षा अधिका-याला आता उपायुक्ताचा दर्जा देण्यात आला आहे.
सुरक्षा विभागातील मुख्य सुरक्षा अधिका-याला महापालिकेच्या सुरक्षा विषयक कामकाजासाठी सतत पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस आणि सैन्य दलातील अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवणे आवश्यक असते. या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधताना मुख्य सुरक्षा अधिकारी या पदनामाने कामकाजात प्रभाव राहत नाही.
तसेच हे पद उपायुक्त या पदाच्या समकक्ष आहे. या दोनही पदांची वेतनश्रेणी समान आहे. त्यामुळे फक्त पदनामात बदल करण्याचा प्रस्तावाला महासभेने मान्यता दिली असून अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविला आहे.