MPSC EXAM News : एमपीएससी परीक्षा केंद्रावर पोहचायचे कसे ?

परीक्षा पुढं ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पूर्व परीक्षा नियोजित वेळेनुसार (रविवारी, दि.11) होणार आहे. एमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. पण, वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात शनिवार, रविवार कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यामुळे परीक्षा केंद्रावर पोहचायचे कसे, असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत आहेत.

एमपीएससीची पूर्व परीक्षा राज्य सरकारने दोनदा पुढे ढकलल्यानंतर राज्यात विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर सरकारने लगेच पुढच्या आठवड्यात परीक्षेचे आयोजन केले होते. यावेळी देखील राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. अशात सरकारने शनिवारी व रविवारी कडक लॉकडाऊन लागू केला आहे.

सरकार महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पूर्व परीक्षा पुढे ढकलते का, अशी शंका विद्यार्थी उपस्थित करत होते. पण, एमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

पण, शनिवार, रविवार कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे परिक्षा केंद्रावर पोहचायचे कसे ? असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत असून, परिक्षा पुढं ढकलण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत.

राज्यात विकेंड लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर ट्वीटवर ‘पोस्टपोन एमपीएससी’ असा हॅशटॅग सुरू झाला. अनेकांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला. शनिवारी, रविवारी लॉकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे परिक्षा केंद्रावर पोहचायचे कसे.

तसेच, मानसिक व शारीरिक स्थिती चांगली नाही अशात परीक्षेचा सामना कसा करायचा. अनेक परिक्षार्थी कोरोना बाधित आहेत त्यांनी कशी परीक्षा द्यायची असे प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत
आहेत.

काही जणांनी पुण्यात येण्याची भिती वाटते असे म्हणत परिक्षा पुढं ढकलण्याची मागणी केली आहे.

11 एप्रिल रोजी होणाऱ्या MPSC परीक्षेचा राज्य सरकारने फेरविचार करावा.काही विद्यार्थी कोरोना बाधित आहेत तसेच काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केली आहे.

भाजप नेत्या किशोरी वाघ यांनी देखील विद्यार्थ्यांच्या मागणी नुसार परीक्षा पुढे ढकलण्याची राज्य सरकारकडे मागणी केली आहे.

‘परीक्षा पुढे ढकलली पाहिजे. कारण अनेक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तसेच, लॉकडाऊनमुळे प्रवासाचे साधन उपलब्ध नाही त्यामुळे परीक्षा केंद्रावर पोहचायचे कसे असा प्रश्न आहे. अशा मनस्थितीत परिक्षेचा सामना कसा करायचा ? थोड्या दिवसांनी परीक्षा पुन्हा आयोजित केली जावी.’

राहुल परदेशी, एमपीएससी परीक्षार्थी

 

‘माझ्या मते परीक्षा व्हायला हवी. एक तासांनी फारसा फरक पडत नाही. परीक्षा केंद्र देखील अनेकांनी आपापल्या जिल्ह्यातील निवडले आहे, त्यामुळे तिथं पर्यंत पोहोचणं अशक्य नाही. परीक्षा रद्द झाल्यास परत अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे नियोजित वेळापत्रकानुसार परिक्षा व्हावी.’

तौसिफ शेख, एमपीएससी परीक्षार्थी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.