Maval News : पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनच्या मावळ तालुका उपाध्यक्षपदी कल्पना केशव भेगडे
एमपीसी न्यूज – पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनच्या मावळ तालुका उपाध्यक्षपदी कल्पना केशव भेगडे यांची निवड करण्यात आली.
पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष गजानन चिंचवडे यांनी कल्पना भेगडे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची मावळ तालुका उपाध्यक्षपदी नियुक्त केल्याचे पत्र दिले.
कल्पना भेगडे यांच्या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारप्रसंगी भेगडे म्हणाल्या 24 तास कर्तव्यावर असलेल्या पोलीस बांधवांच्या समस्या सोडवून पोलीस व जनता संवाद वाढविण्यासाठी अग्रेसर रहाणार.
असोसिएशनच्या वतीने पोलीस व त्यांच्या कुटुंबासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार.