Maharashtra Corona Update : गुड न्यूज ! आज 82,266 जणांना डिस्चार्ज ; 53,605 नवे रुग्ण
एमपीसी न्यूज – राज्यात आज कोरोनाची दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. आज दिवसभरात 82 हजार 266 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, 53 हजार 605 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यासह राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या पन्नास लाखांच्या पुढे गेली आहे.
आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 50 लाख 53 हजार 336 वर जाऊन पोहोचली आहे. त्यापैकी 43 लाख 47 हजार 592 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 28 हजार 213 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Maharashtra reports 53,605 new #COVID19 cases, 82,266 recoveries and 864 deaths in the last 24 hours.
Total cases 50,53,336
Total recoveries 43,47,592
Death toll 75,277Active cases 6,28,213 pic.twitter.com/VnXjXJjwP0
— ANI (@ANI) May 8, 2021
आज 864 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर एकूण 75 हजार 277 जण कोरोनामुक्त मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.49 टक्के एवढा आहे. राज्याचा रिकव्हरी रेट सध्या 86.03 टक्क्यांवर पोहोचला आहे.
सध्या राज्यात 37 लाख 50 हजार 502 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 28 हजार 453 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 91 लाख 91 हजार 331 नमूने तपासण्यात आले आहेत.