Maharashtra Corona Update : राज्यात आज 6,126 नवे कोरोना रुग्ण, 7,436 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (शनिवारी) 6 हजार 126 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर, 7 हजार 436 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 63 लाख 27 हजार 194 एवढी झाली आहे. त्यापैकी 61 लाख 17 हजार 560 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 96.68 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात सध्या 72 हजार 810 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रात आज 195 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 33 हजार 410 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.10 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात आतापर्यंत 4 कोटी 87 लाख 44 हजार 201 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 51 हजार 971 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 3 हजार 009 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.