Hinjawadi News : शिंदे वस्ती नेरे येथून सुमारे दोन लाख रूपयांचा गुटखा व तंबाखू जप्त
एमपीसी न्यूज – शिंदे वस्ती, नेरे ता. मुळशी येथून सुमारे दोन लाख रूपयांचा गुटखा व तंबाखू जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.14) सायंकाळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी एका इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोविंद प्रजापती (पूर्ण नाव माहित नाही) याच्या असे गुन्हा दाखल आरोपीचे नाव आहे. पोलीस हवालदार राजेंद्र सिताराम करणे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या रूममध्ये प्रतिबंधित गुटखा आणि सुंगधित तंबाखूचा साठा करून ठेवला होता. सुमारे दोन काळ रूपयांचा हा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. संबधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.