Pune Corona Update : शहरात नवीन 2 हजार 141 कोरोना रुग्णांची नोंद; 4136 जणांना डिस्चार्ज
एमपीसी न्यूज – पुणे शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत आज सुद्धा वाढ पाहायला मिळाली. शहराच्या विविध भागातील 2 हजार 141 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (गुरूवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 4 हजार 136 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
कोरोनामुळे शहरातील नऊ रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 9 हजार 270 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 6 लाख 46 हजार 482 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 22 हजार 026 सक्रिय रुग्ण शहरात आहेत, यामध्ये आज दिवसभरात 2 हजार 141 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नव्याने नोंद झाली.
पुणे कोरोना अपडेट : गुरुवार, दि. ३ फेब्रुवारी २०२२
◆ उपचार सुरु : २२,०२६
◆ नवे रुग्ण : २,१४१ (६,४६,४८२)
◆ डिस्चार्ज : ४,१३६ (६,१५,१८६)
◆ चाचण्या : १०,५३६ (४३,६७,४५७)
◆ मृत्यू : ९ (९,२७०)#PuneFightsCorona #CoronaUpdate pic.twitter.com/GBje0HhJil— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) February 3, 2022
तर, शहरात आज दिवसभरात 10 हजार 536 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. आजपर्यंत 43 लाख 67 हजार 457 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
शहरात कोरोना रुग्णवाढीचा आलेख कमालीचा उतरता पाहायला मिळत असला तरीही नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.