Todays Horoscope 20 May 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ
आजचे पंचांग – वार – शुक्रवार, दि. 20.05. 2022
- शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.
- आज विशेष – साधारण दिवस.
- राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00
- दिशा शूल – पश्चिमेस असेल.
- आजचे नक्षत्र – उत्तराषाढा.
- चंद्र राशी – धनु- सकाळी 08.45 पर्यंत नंतर मकर.
—————————————-
आजचे राशीभविष्य –
मेष – (शुभ रंग – राखाडी)
व्यवसायात भिडस्तपणास लगाम घालणे गरजेचे आहे. काही निर्णय आज झटपट घ्यावे लागतील. आलेली कुठलीच संधी सोडू नका. मित्रमंडळींना आज लवकर फुटवलेले बरे.
वृषभ – (शुभ रंग- सोनेरी)
वडीलधाऱ्यांशी मतभेद होतील पण तुम्ही त्यांच्या वयाचा मान राखाल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी ही नमते घ्यावे लागेल. आज अहंकारास सुट्टीच देणे हिताचे राहील. सत्संगाने मानसिक बळ वाढेल.
मिथुन – (शुभ रंग- चंदेरी)
आज उतावीळपणे कोणतेही निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. आज तब्येतीच्या किरकोळ तक्रारीही दुर्लक्षित करू नका. महत्त्वाच्या चर्चा वाटाघाटी उद्यावर ढकलाव्यात. आपल्या प्रतिष्ठेची काळजी घ्या.
कर्क – (शुभ रंग – गुलाबी)
बरेच दिवसांनी अपेक्षित असलेल्या प्रिय व्यक्तीचा अचानक फोन येईल. कवींना प्रेमगीते सुचतील. वैवाहिक जीवनात आज तू तिथे मी असे वातावरण असेल. गुरुजींना गृहोद्योगातून चांगली मिळकत होईल.
सिंह – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
आज तुम्ही फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करा. केवळ मोठेपणासाठी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. भावनेच्या भरात कोणाला शब्द देऊन अडकू नका.
कन्या – (शुभ रंग- पिस्ता)
काही नव्या ओळखी होतील तुमचे कार्यक्षेत्र विस्तारेल. तुम्हाला एखाद्या नवीन विषय शिकण्याची संधी मिळेल. मुलांच्या शिस्तीकडे लक्ष पुरवावे लागणार आहे.
तुळ – (शुभ रंग- पांढरा)
आज तुम्ही फक्त कर्तव्यास प्राधान्य देणार आहात. कौटुंबिक वाढत्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना गृहिणींना थकवा जाणवेल. कला-क्रीडा क्षेत्रातील मंडळींचा संघर्ष चालूच राहील.
वृश्चिक – (शुभ रंग- जांभळा)
आज वेळेअभावी कौटुंबिक गरजांकडे तुमचे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. आज आई बरोबर मतभेद संभवतात. आज दुरावलेले शेजारी मात्र जवळ येतील.
धनु – (शुभ रंग – मोरपिशी)
आज योग्य माणसे तुमच्या संपर्कात येतील. ठामपणे घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. हाती पैसा खेळता राहील. प्रवासात काही वेळ खोळंबा होऊ शकतो.
मकर – (शुभ रंग – मरून)
आज हाती पैसा राहील, आवडत्या क्षेत्रात तुम्हाला नेतृत्व करण्याची संधी मिळेल. आज स्वतःचे लाड पुरवाल. उंची वस्त्र खरेदी कराल. एखादी हरवलेली वस्तू दुपारनंतर सापडेल.
कुंभ – (शुभ रंग- नारिंगी)
आज आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकवाल. रिकामटेकड्या चर्चेतून मनस्ताप होण्याची शक्यता आहे. एखाद्या समारंभात वावरताना आपले मौल्यवान ऐवज सांभाळा.
मीन – ( शुभ रंग – डाळिंबी)
हौशी मंडळींना आज जीवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल. आज तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. दुपारनंतर एखादा लाभ संभवतो.
!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन – 9689165424
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)