Todays Horoscope 07 June 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – वार – मंगळवार, दि. 07.06.2022 (Todays Horoscope 07 June 2022)

  • शुभाशुभ विचार – प्रतिकूल दिवस.
  • आज विशेष – साधारण दिवस.
  • राहू काळ – दुपारी 03.00 ते 04.30.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – पूर्वाफाल्गुनी.
  • चंद्र राशी – सिंह.

_________________________

आजचे राशीभविष्य – (Todays Horoscope 07 June 2022)

मेष – (शुभ रंग- पिस्ता)

तुमच्या कार्यक्षेत्रात तुमच्या प्रगतीचा आलेख चढता राहील. नोकरदारांना नोकरीत बदल करायचा असल्यास चांगल्या संधी चालून येतील. पारिवारिक सुखात वृद्धि होईल. मुलांच्या शिस्तिकडे लक्ष द्यावे लागेल.

वृषभ – (शुभ रंग – मरून)

आज तुम्हाला कौटुंबिक कर्तव्य पार पाडण्यासाठी वेळ काढावाच लागेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. आज एखाद्या कामासाठी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल.

मिथुन – (शुभ रंग – राखाडी)

रिकामटेकडी चर्चा फक्त वादास निमंत्रण देईल आज फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे आज तुमच्या जास्तीत जास्त वेळ घराबाहेर जाणार आहे.

कर्क – (शुभ रंग- पांढरा)

आज तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम असून मानसिक स्वास्थ्यही चांगले असेल प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन संभवते. अति स्पष्ट बोलून काही जवळची नाती दुखावू नका.

सिंह – (शुभ रंग – हिरवा )

भावनेच्या भरात दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. नेतेमंडळींची समाजात लोकप्रियता वाढेल. घरात काही हवेहवेसे वाटणारे पाहुणे येतील.

कन्या – (शुभ रंग – भगवा)

आज काही अति आवश्यक खर्च हात जोडून उभे राहणार आहेत. दुरावलेल्या नात्यातील गैरसमज दूर होतील. पासपोर्ट विजा विषयक कामे यशस्वी होतील.

तुळ – ( शुभ रंग- नारिंगी)

नोकरीत तुमच्या कामातील निष्ठा व समर्पण वरिष्ठांना प्रभावित करेल. बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. व्यवसायात सहजच घेतलेले निर्णयही योग्यच ठरतील.

PCMC Election 2022: आरक्षण सोडतीवर 273 हरकती; प्रभाग 2, 5 मधील आरक्षणावर सर्वाधिक हरकती

वृश्चिक – (शुभ रंग – केशरी)

नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ गोड बोलून राबवून घेतील. भावना व कर्तव्य यांचा समन्वय साधणे आज कठीण जाईल. जितके कमी बोलाल तितके चांगले राहील.

धनु – ( शुभ रंग – मोरपंखी)

वैवाहिक जीवनात आज संध्याकाळी क्षुल्लक मतभेद होतील. परंतु त्यातून सामंजस्याने मार्ग निघेल. आज कुठेही मोठे आर्थिक व्यवहार सतर्कतेने करा.

मकर – ( शुभ रंग- आकाशी)

व्यावसायिक चढ उतारांचा सामना करावा लागेल, काही मनाविरुद्ध घटना आज मनास बेचैन करतील. आज थोडा संयम ठेवण्याची गरज आहे. व्यर्थ वाद टाळा.

कुंभ – ( शुभरंग- स्ट्रॉबेरी)

आज तुम्ही स्वतःचे लाड पुरवण्यासाठी खर्च कराल. तरुणांना घरातील थोरांचे विचार पटणार नाहीत. नोकरदारांना कामावर दांडी मारून घरी आराम करायचा मूड असेल.

मीन – ( शुभ रंग- गुलाबी)

आजच स्वावलंबन महत्वाचे राहील. दुपारनंतर दिवस अनुकूल नाही. जवळच्या मित्रांमध्ये वितुष्ट संभवते. काही जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. तुम्हाला विश्रांतीची गरज आहे.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी
फोन – 9689165424
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.