Today’s Horoscope 1 September 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य
एमपीसी न्यूज: आजचे पंचांग – Today’s Horoscope 1 September 2022
वार – गुरूवार.
01-09-2022
शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.
आज विशेष – ऋषिपंचमी.
राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आजचे नक्षत्र – स्वाती.
चंद्र राशी – तुळ.
________________________
आजचे राशीभविष्य
मेष – ( शुभ रंग राखाडी)
हौस मौज जरूर करा. करा परंतु आपल्या मर्यादा सांभाळाव्या. कुसंगती पासून लांब रहा वाहन चालवताना जरा जपून. अडचणीच्या प्रसंगी आज जोडीदाराची खंबीर साथ राहील.
वृषभ ( शुभ रंग – डाळिंबी)
क्षुल्लक वाटणाऱ्या कामातही ऐनवेळी अडचणींचे डोंगर उभे राहतील. वैवाहिक जीवनात लाडिक रुसवे-फुगवे असतीलच.
मिथुन – ( शुभ रंग- पिस्ता )
कलाक्षेत्रातील मंडळींना आज रसिकांची दाद मिळेल. उच्चशिक्षितांच्या महत्त्वकांक्षा वाढतील स्वतःचे छंद जोपासण्यासाठी पैसा खर्च कराल. विद्यार्थ्यांना कोणत्याही स्पर्धेत यश मिळेल.
कर्क (शुभ रंग- क्रीम )
हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी करू नका. आज तुम्हाला काही घरगुती प्रश्न लक्ष घालावे लागेल. वास्तु व वाहन खरेदी संदर्भातील काही अडचणी दूर होतील.
सिंह- ( शुभ रंग- जांभळा)
शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल काहीजण सहकुटुंब प्रवासास निघतील प्रवासात नवे हितसंबंध जुळतील. कुणाला मोफत सल्ले द्यायला जाऊ नका. फक्त वाणीत गोडवा असू द्या.
कन्या – (शुभ रंग- सोनेरी)
आज तुम्हाला एखाद्या कामासाठी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागणार आहे. महत्त्वाच्या चर्चेत वाणीत मृदुता ठेवा. आज काही प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन होईल. शक्य असल्यास प्रवास टाळा.
तुळ – ( शुभ रंग – लाल)
आज अनपेक्षित रित्या काही रक्कम हाती येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर खर्चही विविध मार्ग तुम्हाला खुणावतील. विविध जाहिराती गृहिणींना भुरळ घालतील.
वृश्चिक -( शुभ रंग- चंदेरी)
आज तुम्ही आपल्याच धुंदीत व आपल्याच मस्तीत राहाल. इतरांचे विचार पटणार नाहीत. अति आत्मविश्वास आर्थिक नुकसानास कारणीभूत ठरू शकेल.
धनु (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होईल आज सकारात्मक राहून दिवस सत्कारणी लावा. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व.
मकर- ( शुभ रंग- पांढरा)
उच्चशिक्षित असाल तर मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. निर्णय घेण्यास विलंब होऊ देऊ नका. आज भावने पेक्षा कर्तव्यासच प्रधान्य देणे गरजेचे आहे.
कुंभ ( शुभ रंग- निळा)
अविश्रांत मेहनतीच्या जोरावर ध्येयाकडे आज तुमची वाटचाल सुरू राहील. मित्रांपासून दोन हात लांबच राहा. क्षुल्लक गैरसमजामुळे दुरावलेले आप्तस्वकीय जवळ येतील.
मीन- ( शुभ रंग- गुलाबी)
आज नोकरीत कामाचा प्रचंड ताण राहील. कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडतील. वरिष्ठांशी नमते घ्यावे व सहकाऱ्यांशी जुळवून घ्यावे. कायदा मोडण्याचा विचारही करू नका.
!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)