Pune Crime : सराईत गुन्हेगाराचा खून करून पसार झालेला कुख्यात गुंड अटकेत

एमपीसी न्यूज : पुण्यातील नाना पेठेत (Pune Crime) सराईत गुन्हेगार रोहन रवींद्र पवार याच्यावर सपासप वार करून फरार झालेल्या सराईत गुन्हेगार सुशांत उर्फ मट्या शशिकांत कुचेकर याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मट्या हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. पुणे शहर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तब्बल 16 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलिसांनी त्याला 2016 मध्ये दोन वर्षासाठी शहरातून तडीपार केले होते.

नाना पेठेतील राजवाडी परिसरात भर वस्तीत रोहन पवार याचा खून करण्यात आला होता. रोहन पवार याला घरातून बाहेर बोलावून सहा जणांनी कोयत्याने आणि दगडविटांनी मारहाण करून त्याचा खून केला. समर्थ पोलिसांनी यातील काही आरोपींना अटक केली होती. तर मुख्य आरोपी सुशांत याच्यासह इतर आरोपी फरार होते. त्यानंतर गणेश शाखेच्या युनिट एकने सुशांत सह तिघांना अटक केली आहे.

Vadgaon Maval : आरती म्हाळसकर यांची उत्पादन शुल्क विभागात उपनिरीक्षक पदी निवड

सुशांत उर्फ मट्या शशिकांत कुचेकर (वय 28), तेजस अशोक जावळे (वय 32) आणि अतिश अनिल फाळके (वय 27) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. आरोपींनी खून केल्याची कबुली दिली आहे. पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून त्यांनी रोहन पवारचा खून केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.