PCMC: महापालिका कंत्राटदारांना ‘रेट द कॉन्ट्रॅक्टर’ पद्धत अवलंबविण्याचा विचार; आयुक्त सिंह

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कंत्राटदाराला (PCMC) नावीन्यपूर्ण अशा ‘रेट द कॉन्ट्रॅक्टर’ अर्थात कंत्राटदाराला गुणांकनाची पद्धत अवलंबणे, त्या आधारावर कंत्राटदाराला पुढील काम द्यायचे की नाही, याबाबतचा निर्णय घेण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिले.

शहरातील उन्मुक्त युवा संगठन या युवा पिढीच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील विविध समस्या मांडण्यासाठी आणि त्यावरील उपाययोजना आयुक्तांना अवगत करून देण्यासाठी महापालिका भवन येथे त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. या भेटीमध्ये तरुणांनी रस्ते विकास आणि अर्बन स्ट्रीट प्रकल्प, सार्वजनिक वाहतूक, पर्यावरण, पाणीपुरवठा, नागरी सहभाग यांसारख्या विषयांवर आयुक्तांशी चर्चा केली त्यांनी देखील या युवकांच्या मागण्या ऐकून घेऊन सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी दिले.

विशेषतः या युवकांनी सुचवलेल्या नावीन्यपूर्ण अश्या ‘रेट द कॉन्ट्रॅक्टर’ अर्थात कंत्राटदाराला गुणांकन ज्या अंतर्गत नागरिकांना महापालिकेच्या कंत्राटदाराला त्याने केलेल्या कामाविषयी रेटिंग अर्थात गुणांकन देता येईल आणि त्याच्या आधारावर त्या कंत्राटदाराला पुढील काम द्यायचे की नाही हा निर्णय घेण्याबाबत सकारात्मक विचार करू असे आश्वासन आयुक्तांनी यावेळी दिले.

PCMC: लाच घेतल्याप्रकरणी अटक झालेल्या लिपिकाला महापालिका सेवेतून निलंबित

सध्या शहरात अनेक ठिकाणी अर्बन स्ट्रीट तसेच रस्ते काँक्रीटीकरण प्रकल्प अतिशय मंद गतीने सुरु आहेत. ज्याचा त्रास नागरिकांना होत आहे. काम सुरु असलेल्या परिसरात धुळीचे साम्राज्य, व्यवासायिकांच्या (PCMC) व्यवसायावर परिणाम, नागरिकांना चालताना होणार त्रास तसेच छोट्या अंतरासाठी मारावा लागणार मोठा वळसा अश्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे तेव्हा हे सुरु असलेले रस्त्यांचे प्रकल्प तात्काळ पूर्ण करावेत.

शहरात सध्या अमर्याद स्वरूपात काँक्रीटीकरण सुरु आहे अनेक ठिकाणी गरज नसताना डांबरी रास्ता उखडून सिमेंटचे रस्ते बनवण्याचे काम सुरु आहे. डांबरी रस्त्यापेक्षा सिमेंटचा रास्ता बनवण्याचा खर्च हा 30% जास्त आहे. तरी देखील सिमेंटच्या रस्त्यांचा अट्टहास का केला जातो हे अनाकलनीय आहे. तसेच अनेक अभ्यासकांच्या मते सिमेंटच्या रस्त्यामुळे परिसरातील तापमानात वाढ होते असे निरीक्षण नोंदवले आहेत, तेव्हा शहरातील रस्ते सिमेंटचे असावेत का डांबरी याचे धोरण महापालिकेने ठरवावे तसेच स्थानिक नागरिकांची मते देखील विचारात घेण्यात यावीत.

काँक्रीटीकरण बरोबरच शहरात अनेक ठिकाणी अर्बन स्ट्रीटचे काम सुरु आहेत अश्या अनेक ठिकाणी पदपथ मोठे आणि रस्ते अरुंद झाल्याचे दिसून आले आहे. ज्या परदेशातील शहरांचा या प्रकल्पासाठी अभ्यास झाला तेथील परिस्थिती आणि आपल्या शहरातील परिस्थती भिन्न असून सुद्धा हा प्रकल्प सर्वत्र राबवणे सुरु आहे तसेच हे मोठे केलेले पदपथ आणि सायकल ट्रॅक अतिक्रमणाचे नवे केंद्र बनले आहे तेव्हा भरमसाठ खर्च करून करण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचा पुनर्विचार व्हावा अशी विनंतीही त्यांनी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.