PMPML :पीएमपीएमएलची रातराणी बस सेवा गुरुवारपासून पूर्ववत

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (PMPML) प्रवाशांच्या मागणीनुसार उद्या म्हणजेच गुरुवार (दि.8) रोजी पासून 5 मार्गावरती रातराणी बससेवा पूर्ववत सुरु करण्यात येत आहे, असे पीएमपीएमलकडून जाहीर करण्यात आले आहे.

काही कारणास्तव बंद पडलेली रातराणी बसमार्ग पुर्ववत होत आहे. मात्र यावेळी यात पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश नसून पुणे शहरातील पाच मार्गिकांचा समावेश आहे.

मध्यरात्री येणाऱ्या एसटी बसेस, रेल्वे यांनी येणाऱ्या बाहेरील शहरातील प्रवाशी तसेच रात्रौपाळी करणाऱ्या हॉस्पीटल, विविध आयटी संस्था, कंपन्या, हॉटेल्स इ. मधील कर्मचाऱ्यांसाठी ही विशेष प्रवाशांच्या सुरक्षिततेचा व सुविधांना प्राधान्य देऊन ही बससेवा सुरु केली आहे. या बसेस रात्री पावणे बारा ते पहाटे पाच या कालावधीत धावतात. हि बससेना पुर्वी एक तासाच्या वारंवारितेने देण्यात येत आहे.

 

नव्याने सुरु होणाऱ्या बसेसचे वेळापत्रक पुढील प्रमाणे – PMPML

1) रातराणी मार्ग 1 – कात्रज ते शिवाजीनगर (नविन एसटी. स्टँड) स्वारगेट, शनिपार, म.न.पा. भवन

 

2) रातराणी मार्ग 2 – कात्रज ते पुणे स्टेशन स्वारगेट, नानापेठ, रास्ता पेठ

 

3) रातराणी मार्ग 3 – हडपसर ते स्वारगेट वैदुवाडी, रामटेकडी, पुलगेट

 

4) रातराणी मार्ग 4 – हडपसर ते पुणे स्टेशन पुलगेट, बॉम्बे गॅरेज, वेस्टएंड टॉकिज

 

5) रातराणी मार्ग पाच – पुणे स्टेशन ते एनडीए गेट 10 नाना पेठ, लक्ष्मी रोड, डेक्कन कॉर्नर

तसेच बस मार्ग क्र.114 म.न.पा. भवन ते म्हाळुंगेगांव या मार्गाचा विस्तार पाडळे चौका पर्यंत करण्यात येत आहे. हा मार्ग पुणे विद्यापीठ, बाणेरगांव, म्हाळुंगेगांव व पाडळे चौक असा असणार आहे.

तरी या बससेवेचा लाभ प्रवाशी, नागरिक, विद्यार्थी, नोकरदार व महिला वर्ग यांनी घ्यावा असे आवाहन महामंडळा मार्फत केले गेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.